संपूर्ण वाडा (२१ तासांसाठी)

साखरपुडा, लग्न, मुंज, बारसं इत्यादी मोठ्या समारंभांसाठी संपुर्ण वाडा रात्रीच्या वास्तव्यासह २१ तासांसाठी भाड्याने देणे.

समारंभाचा कार्यकाल :- सायंकाळी ६ ते दुसरे दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत.

आपल्या समारंभाच्या वेळी ढेपे वाड्यात इतर पर्यटक असणार नाहीत

ढेपे वाड्याविषयी माहीती :-

  • ढेपेवाडा पुण्यातील चांदणी चौकापासून ३८ कि.मी वर आणि मुंबईकडून येताना जुन्या हायवेवरील कामशेत फाट्यापासून ४० कि.मी अंतरावर आहे.
  • ढेपेवाड्यात सर्व सोयींनी युक्त अशा १4 खोल्या (अॅटॅच टॉयलेट्सह) व एक कोकणीघर (६ टॉयलेट्सह) उपलब्ध आहे.
  • ढेपेवाड्यात 7० ते 9० लोकांच्या रात्रीच्या निवासाची सोय होऊ शकते. दुसरे दिवशी कार्यासाठी 4०० लोकांपर्यंत अतिथी येऊ शकतात.
  • कार्यासाठी रात्रीच्या निवासाला 9० पेक्षा जास्त व्यक्ती येणार असल्यास त्यांची सोय आजुबाजूचे बंगले भाड्याने घेऊन करता येऊ शकते.
  • ढेपे वाड्याबद्दल अधिक माहीतीसाठी आपण www.dhepewada.com ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच Youtube, Google, Instagram वर Dhepewada सर्च करावे.
  • ढेपे वाडा हा नुसता पहाण्यासाठी उपलब्ध नसून आमच्या पुणे येथील ऑफिसमध्ये रितसर बुकींग करणाय्रा व्यक्तींनाच फक्त इथे प्रवेश दिला जातो.
ढेपेवाड्यातील भोजन व्यवस्थेबाबत माहीती :-

  • वाड्यातील सर्व भोजन हे शुद्ध शाकाहारी पद्धतीने असेल.
  • भोजनाचा मेनू आमच्या यादीतून आपणास निवडता येईल.
  • सर्व भोजनांची व्यवस्था बुफे पद्धतीने असेल.
  • वयोवृद्ध / दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यकता भासल्यास वाड्यातील तळमजल्यावर भोजनाची व्यवस्था करुन दिली जाईल.
ढेपेवाड्यातील आरक्षणासंदर्भातील माहिती व नियम :-

  • कार्याचे बुकिंग प्रथम पैसे भरणाय्रास प्राधान्य ह्या नुसार होईल.
  • कार्याचे बुकिंग करतेवेळी किमान ५०% रक्कम त्यावर लागू असलेल्या करासह भरावी.
  • झालेले बुकिंग रद्द करायचे असल्यास कार्यक्रमाच्या ६० दिवस आधी कळवल्यास २५,०००/- रक्कम वजा करुन पुढील २ महीन्यासाठी बुकिंगची मुदत वाढवता यॆऊ शकेल याची कृपया नोंद घ्यावी.
  • कार्याच्या किमान १५ दिवस अगोदर कार्यासंबंधीची संपुर्ण रक्कम जमा करावी.
  • आपले आरक्षण निश्चित करण्यासाठी कृपया आमच्या Chandrasheel Landmarks, ह्या नावाने असलेल्या IDBI Bank Account Number – 588102000003780 (IFSC code –IBKL0000588) अकाउंटमध्ये आपल्या Paytm / Google pay/Bhim app/ Net banking / रोखीने / R.T.G.S मार्फत जमा करावी.

ढेपेवाड्यातील कार्यासंदर्भातील माहीती व नियम :-

  • ३० तासांसाठी ढेपेवाडा भाड्याने घेतल्यास वाड्याचा ताबा सकाळी ९ ते दुसय्रा दिवशी दुपारी ३ वा. पर्यंत राहील.
  • कार्याचा सर्व तपशील व मेनू किमान १५ दिवस अगोदर ठरवावा.
  • कार्यासाठी आमच्यातर्फे मे. इव्हेंट कंपनी/डेकोरेटर नेमले आहेत त्यांचेकडूनच आपण काम करुन घ्यावे.
  • वाड्याच्या आवारात तसेच लगतच्या रस्त्यावर फटाके, व डि.जे वाजविण्यास पूर्ण बंदी आहे. तसेच अमली पदार्थ व पेय यांच्या सेवनास संपूर्णत: बंदी आहे.
  • कार्यक्रमाच्या दिवशी वाड्यात सजावट फक्त चौकातल्या खांबावर (कॉलम्स) व वाड्याबाहेरील जागेत करता येईल सदर ती सजावट स्वतंत्र स्वत:च्या स्टॅन्डवरच करावी, त्याकरीता खिळे ठोकणे, तारा अडकविणे तसेच चिकटपट्टीचा वापर करण्यास परवानगी नाही.
  • कार्यवाहकांनी सर्व सरकारी नियमांना अधिन राहून कार्याची आखणी करावी. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काही दंडात्मक कारवाई झाल्यास त्याची जबाबदारी कार्यवाहकाची राहील.
  • आपली व आपल्या अतिथींची / मुलाबाळांची काळजी आपण घ्यायची असून वाडा व वाड्याच्या परिसरात झालेल्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे / मानवी चुकांमुळे झालेल्या अपघातास ढेपे वाडा व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
  • आपले कार्य सुरळीतपणे पार पडावे ह्यासाठी ढेपे वाडा व्यवस्थापनाने हे नियम केले आहेत ह्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी कार्यवाहकाची राहील. ढेपेवाडा व्यवस्थापन आपले कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपणास सर्वतोपरी सहकार्य करेल.
  • इतर अटी व शर्ती लागू.

Dhepe wada wedding
Wedding Decoration at Dhepewada
Wedding Decoration - Dhepe Wada
Celebration at dhepewada
error: Content is protected !!