कौटुंबिक समारंभासाठी
(७ तास)

ढेपे वाड्यात पारंपारिक पद्धतीने खाली नमुद केलेले कौटुंबिक समारंभ व सण साजरे करण्यासाठी
७ तासांसाठी ढेपे वाडा उपलब्ध

1) साखरपुडा
2) बारसं
3) बोरन्हाण
4) वाढदिवस
5) केळवण

6) व्याहीभोजन
7) मंगळागौर
8) डोहाळजेवण
9) एकसष्ठी
10) एकाहत्तरी

11) पंचाहत्तरी
12) सहस्त्रचंद्र दर्शन
13) गुरुपौर्णिमा
14) राखी पौर्णिमा
15) नवरात्री – भोंडला

16) कोजागीरी पौर्णिमा
17) मित्रांची, नातेवाईकांची स्नेहसंमेलनं
18 कुलसंमेलनं
19) दिवाळसण / भाऊबीज
20) संक्रातसण

दिवसभरासाठीच्या ( ७ तासांसाठी ) कार्यक्रमांसाठी वाडा भाड्याने देणे

आगमनाची वेळ :- सकाळी ९ वाजता - निर्गमनाची वेळ :- दुपारी ४ वाजता.

आपल्या समारंभाच्यावेळी वाड्यात इतर पर्यटक असतील.

  • ढेपे वाडा पुण्यातील चांदणी चौकापासून ३८ कि.मी वर आणि जुन्या हायवेवरील कामशेत फाट्यापासून ४० कि.मी अंतरावर आहे. दोन्ही मार्गांनी ढेपे वाड्याला पोहोचण्यास साधारणत: दिड तास लागतो.
  • अमर्यादीत भोजनाचा बेत शुद्ध शाकाहारी असेल, सर्व प्रकारचे भोजन बुफे पद्धतीने दिले जाईल, सकाळच्या नाष्ट्याची वेळ १० वाजेपर्यंत व दुपारच्या जेवणाची वेळ २:३० वा. पर्यंतच राहील.
  • आमचा मेन्यू फिक्स असतो त्यामुळे निवडीचा पर्याय उपलब्ध नाही मात्र ५० लोकांपेक्षा जास्त माणसं असल्यासच मेन्यू निवडीचा पर्याय देण्यात येईल.
  • ठरलेल्या अतिथींची संख्या आयत्यावेळेस कमी झाल्यास पैसे कमी होणार नाहीत किंवा अन्न बांधून दिले जाणार नाही. लहान मुलांसाठी पुर्णदर लागू होईल.
  • वयोवृद्ध लोकांसाठी भोजनाची सोय वाड्यातील तळमजल्यावर करता येऊ शकते.
  • वाड्यात तुमच्यासह इतर पर्यटक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे डेकोरेशन किंवा इव्हेंट करता येणार नाही त्यासाठी संपूर्ण वाड्याचे पॅकेज घ्यावे लागेल.
  • आपले आरक्षण निश्चित करण्यासाठी कृपया आमच्या Chandrasheel Landmarks, ह्या नावाने असलेल्या IDBI Bank Account Number – 588102000003780 (IFSC code -IBKL0000588) अकाउंट मध्ये आपल्या Paytm / Google pay/ Bhim app/ Net banking / रोखीने / R.T.G.S मार्फत जमा करावी.
  • ढेपे वाडा हा नुसता पहाण्यासाठी उपलब्ध नसून आमच्या पुणे येथील ऑफिसमध्ये रितसर बुकींग करणाय्रा व्यक्तींनाच फक्त इथे प्रवेश दिला जातो.
  • अटी व शर्ती लागू.

Dhepe wada wedding
Wedding Decoration at Dhepewada
error: Content is protected !!