• आमच्या पुणे येथील ऑफिस मध्ये आगाऊ आरक्षण (Advance Booking) करणा-या पर्यटकांनाच ढेपे वाड्यात प्रवेश दिला जाईल.
  • ढेपे वाड्यात प्रवेश करतेवेळी आपले ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे
  • ढेपे वाडा व परिसरात मद्यपान व धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
  • आपल्या वाहनांचे पार्कींग आपल्या जबाबदारीवर करावे. व्यवस्थापन त्यास जबाबदार राहणार नाही.
  • ढेपे वाड्यात कुठल्याही प्रकारचे पाळीव प्राणी आणू नयेत.
  • आपली व आपल्या मुलाबाळांची काळजी आपण स्वत: घ्यायची असुन वाडा व वाड्याच्या परिसरात झालेल्या कुठल्याही अपघातास आम्ही जबाबदार राहणार नाही.
  • ढेपे वाड्यात बाहेरील खाद्य पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे.
  • सर्व पर्यटकांसाठी भोजनाचा बेत शुद्ध शाकाहारी असेल तसेच सर्व खाद्यपदार्थ भोजनालयातच उपलब्ध होतील.
  • ढेपे वाडा ही वास्तु आपला सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा आपल्याला पुढच्या पिढी पर्यंत पोचवायचा असून त्या पिढीला ह्या वारशाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळावी ह्या दॄष्टीने प्रयत्न करावा.
  • ढेपे वाडा ही वास्तु ही आपली स्वत:चीच आहे असे समजावे. ह्या वास्तुचे कुठल्याही प्रकारे नुकसान होईल असे वर्तन टाळावे.
  • ढेपे वाड्याच्या आजुबाजुचा परिसर वाड्या व वस्त्या तसेच छोट्या गावांनी वेढलेला असुन रात्री १० नंतर कुठल्याही प्रकारे शांततेचा भंग होईल असे वर्तन करू नये.